Saturday, May 23, 2009

Bhuibavada ... भुईबावडा माझा गाव




"सह्याद्रिचा रम्य परिसर,सिधुदुर्गाचा भव्य आधार." सह्याद्रिच्या नयनरम्य परिसरात,सिधुदुर्गाच्या विशाल छायेत,संमृढ्धि आणि शांततेत वसलेले असे माझे "भुईबावडा" हे गाव. संपुर्ण गावाच्या माथ्यावर गगनगिरि महाराजांचा जणुकाही वरदहस्त, अशाप्रकारे गावाच्या पुर्वेला गगनगिरि महाराजांचे गडावर वास्तव्य. आपल्या आशिर्वादाच्या छायेखाली संपुर्ण गाव न्याहाळत तिथे त्यांचा मठ.
गाव तसे छोटेखानी सुंदर. सिंधुदुर्ग जिल्हा व वैभववाडी तालुक्याच्या पंचक्रोशित नावारुपाला आलेले "भुईबावडा" Bhuibavada हे माझे गाव. गावाच्या मध्यभागी, गावातच उगम पावलेली, झुळझुळ वाहणारी नदी. नदीच्या काठावर सुरम्य शेती. गावातील वस्ति तशी थोडकिच परंतु कष्ट आणि कनवाळु वृत्ती. पैलतिरी श्री.माधवराव मोरे व सौ. सरस्वती मोरे यांच्या पुण्यईतुन श्री.काशिराम मोरे, आत्माराम मोरे व सीताराम मोरे यांच्या कष्टातुन साकारलेली वास्तु म्हाणजे माझे चौसोपी कौलारु घर. गावाच्या मधोमध नववधुच्या भांगातील कुंकवासारखि शोभणारि सुसज्ज बाजारपेठ, बाजारपेठेतुन जाणारा अनेक गावांना जोडणारा एखाद्या शोडशेच्या पाटठीवर सोडलेल्या केशकलापासारखा,काळाभोर नागमोडी वळणाचा रहदारिचा मार्ग. तालुक्याच्या गावी,अन्य इतर ठिकाणी जाण्या येण्यासाठी एस.टी.महामंडळाच्या गाड्यांची अत्यंत सुयोग्य अशी व्यवस्था.
भुईबावडा Bhuibavada गावाच्या उत्तरेला 'रवळनाथाचे'भव्य मंदिर, आपली कृथार्त द्रुष्टी सगळ्या गावावर ठेउन गावाचे रक्षण करत भाविकांना साद घालते.मंदिराचा परिसर अतिशय रम्य असा घनदाट झाडावेलिंनी बहरलेला.मंदिरात येणारे भाविक झाडांच्या मायेच्या सावलीत देहभान हरपुन जातात्.रवळनाथाच्या आजुबाजुलाच श्री. दत्त महाराज,गांगो,विठठल रखुमई अन्य मंदिरांचे वास्तव्य,या देवदेवतांची मायेची पाखर सदैव गावावर. या मंदिरांच्याच समोर माझे विद्या मंदिर ... माझी शाळा आदर्श विद्या मंदिर भुईबावडा...... आनंदाचे व एकोप्याचे सम्यक म्हणजे 'भुईबावडा'.

1 comment:

  1. नववधुच्या भांगातील कुंकवासारखि शोभणारि सुसज्ज बाजारपेठ.....

    आनंदाचे व एकोप्याचे सम्यक म्हणजे "भुईबावडा" - नाही भांडण.. नाही राडा...

    दादा आपला गाव लंय... लंय... भारी...!

    ReplyDelete